Indian Post GDS Recruitment 2024: देशाच्या महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या भारतीय डाक विभागात जम्बो नोकरभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये 44,228 रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 10वी पास उमेदवार संपूर्ण देशभरातून अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. यासाठी कोणतीही परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड फक्त 10वी मधील गुणांवरून केली जाणार आहे.
भरतीचे तपशील:
- भरतीचे नाव: भारतीय डाक विभाग भरती 2024
- भरती विभाग: पोस्ट विभाग
- भरती श्रेणी: सरकारी नोकरी
- पदाचे नाव: ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
- उपलब्ध पदसंख्या: 44,228
शैक्षणिक पात्रता:
- 50% गुणांसह 10वी परीक्षा उत्तीर्ण
- MS-CIT किंवा समतुल्य कम्प्युटर कोर्स
- प्रादेशिक भाषांचे ज्ञान
वयोमर्यादा:
- खुल्या प्रवर्गासाठी: 18 ते 40 वर्षे
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी: 3-5 वर्षे सूट
वेतनश्रेणी:
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
ब्रांच पोस्टमास्टर | ₹12,000 – ₹29,380 प्रति महिना |
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर/डाक सेवक | ₹10,000 – ₹24,470 प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अर्ज करण्यास सुरुवात तारीख: 15 जुलै 2024
- अंतिम मुदत तारीख: 05 ऑगस्ट 2024
- अर्ज एडीट करण्याची तारीख: 06-08 ऑगस्ट 2024
महत्वाच्या सूचना:
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक पात्रता तपासण्यासाठी अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून अर्ज करावेत.
- सर्व माहिती योग्य रित्या भरून, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासणे आवश्यक आहे, कारण एकदा सबमिट झाल्यानंतर अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाहीत.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होतील.
अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक:
- अधिकृत जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
- Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
लवकरात लवकर अर्ज करा आणि भारतीय डाक विभागात तुमच्या सरकारी नोकरीची सुरुवात करा!
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.