ऍग्रो न्यूज १८ | २० ऑक्टोबर २०२४ | पुणे ब्युरो
gold rate today pune: पुण्यात सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सराफ बाजारात मागील तीन दिवसांत प्रति तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्याने ८० हजार रुपयाचा टप्पा गाठला आहे. दिवाळीच्या अगोदरच झालेली ही किंमतवाढ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून ईस्त्राईल-हमास युद्धामुळे सोन्याचे दर वाढल्याचे जाणकारांचे मत आहे. युद्धजन्य परिस्थिती आणखी गंभीर झाली तर दिवाळीत सोन्याचे दर ८५ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही वाढ आणखी चिंतेचा विषय ठरू शकते.
पुण्यातील सराफ बाजारातील सोन्याचे भाव
शुक्रवारी पुण्यात सोन्याच्या दरात ९०० रुपयांची वाढ झाली. जीएसटीसह सोन्याचा दर प्रति तोळा ८०,३४० रुपयांवर पोहोचला आहे. तर विनाजीएसटी सोनं ७८,००० रुपयांना उपलब्ध आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही हजार रुपयांची वाढ होत ९४,००० रुपये प्रति किलो झाला आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी (२४ ऑक्टोबर) सोने खरेदीचा कल मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्या दिवशी सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सोनं आणि चांदीचे दर भविष्यात आणखी किती वाढतील, हे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असणार आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.