garlic rate today: लसूण भाव कडाडला; पहा आजचा भाव!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

garlic rate today: राज्यात सध्या शेतमाल भाव कोसळले असले असताना सोयाबीन, कांदा, तूर, कापूस इत्यादींच्या भावात घसरण होताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला लसणाचा भाव चांगलाच वाढला आहे. सध्या मार्केट मध्ये लसणाची आवक खूपच कमी प्रमाणात सुरु आहे आणि नवीन लसूण बाजारात यायला अजून वेळ आहे यामुळे लसणाच्या बह्व्त तेजी दिसून येत आहे.

लसणाची आवक जास्त कोणत्या बाजार पेठेत होते

महाराष्ट्रात लसूण प्रामुख्याने पुणे, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये घेतला जातो. तसेच येथील बाजरी पेठेमध्ये लसूण आवक जास्त होते. पण या वर्षी या भागामध्ये सध्या लसणाची आवक खूप कमी झाली आहे. त्यामुळे पर राज्यातून म्हणजे राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातून महाराष्ट्रामध्ये सध्या लसणाची आवक होत आहे.

Garlic Rate Today लसूण भाव महाराष्ट्र

सध्या लसणाचा भाव हा किरकोळ बाजारात ४०० रुपये प्रतिकिलो विकल्या जात आहे तर घाऊक बाजारामध्ये ३५० रुपये प्रति किलो या दराने विकलं जात आहे.  यामुळे लसूण सर्वसामन्याला परवडत नाही आहे  कारण आता फक्त पावशेर लासनाला शंभर रुपये जात आहेत. तसेच थंडी गेल्या नंतर म्हणजे मार्च मध्ये नवीन लसूण आवक होण्यास सुरवात होईल तोवर झळ सोसण्याशिवाय पर्याय नाही.

लसूण भाव

१० किलो लसूण  – क्वालिटीनुसार १५०० ते ३००० रुपये प्रति १० किलो साठी

१ किलो लसूण – क्वालिटी नुसार रुपये ३०० ते ४०० रुपये प्रति किलो साठी

तर इतर शेतीमाल सोयाबीन, कापूस, तूर, कांदा याना भाव वाढीचे चिन्ह ददसत आंही आहे पण लसणात चांगलीच तेजी दिसत आहे त्यामुळे लसूण उत्पादक शेतकरी वर्ग खुश दिसत आहे.

Leave a Comment