free electricity scheme for farmers :शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू; जाणून घ्या कसा मिळेल लाभ!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

free electricity:भारतातील शेती पावसावर अवलंबून असते. मात्र, जागतिक हवामान बदलामुळे मोसमी पावसात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत, ज्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एप्रिल 2024 पासून 7.5 एचपीपर्यंतच्या शेती पंपांसाठी मोफत वीज पुरवण्याची योजना जाहीर केली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार देणार 10 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान, यादी जाहीर

योजना तपशील:

25 जुलै 2024 रोजी राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत 7.5 एचपी क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज दिली जाईल. महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार, कृषी पंपांना रात्री 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज वीजेची उपलब्धता दिली जाईल.

सध्याचा पाऊस कशामुळे आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा असेल ?

पात्रता:

राज्यातील 7.5 एचपीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील. एकूण 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अनुदान:

या योजनेसाठी राज्य सरकारने 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात मंजूर केले आहे. या रकमेतून शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात येईल आणि महावितरण कंपनीला ही रक्कम सरकारकडून अदा करण्यात येईल.

राज्यातील ३४ तालुक्यांत होणार डिजीटल क्रॉप सर्वेक्षण; इतर तालुक्यांत होणार ई पीक पाहणी ! पहा तालुक्यांची यादी

कालावधी:

ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यात येईल. तीन वर्षांच्या कालावधीनंतर योजनेचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

अंमलबजावणी:

महावितरण कंपनी या योजनेची अंमलबजावणी करणार असून, शेतकऱ्यांना वीज बिल माफीसाठी 6,985 कोटी रुपये आणि वीजदर सवलतीसाठी 7,775 कोटी रुपये वार्षिक दिले जातील.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही एक महत्वपूर्ण योजना असून, राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याचे धोरणही ठरविले आहे.

Leave a Comment