farmer loan waiver: 3 लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार का ? तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अपेक्षा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

farmer loan waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. महायुती सरकारवर शेतकऱ्यांची नाराजी वाढली असून, कर्जमाफीची घोषणा होईल अशी चर्चा सध्या रंगली आहे.

अचानक सोन्याचे दर धाडकन पडले;
पहा तुमच्या जिल्ह्यातला भाव !

धोरणातील धरसोडीमुळे नाराजी
सरकारच्या धोरणातील धरसोडीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजप सत्तेत आहे. हरियाणा सरकारने शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले तर महाराष्ट्रातील महायुती सरकारला ते का करता येत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. केवळ हमीभावाची घोषणा न करता ठोस अंमलबजावणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

तेलंगणाच्या कर्जमाफीचा महाराष्ट्रात प्रतिसाद farmer loan waiver Telangana state
तेलंगणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तेलंगणातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सूतोवाच ,
येथे क्लिक करा व पहा पैसे किती वाढणार?

महाराष्ट्रातील मागण्या आणि राजकीय हालचाली
शेती प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांनी तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन कर्जमाफीसाठी निवेदन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर आरोप केला आहे की, उद्योगपतींचे 10 लाख कोटींचे कर्ज माफ केले, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले नाही.

महाराष्ट्र सरकारची भूमिका farmer loan waiver government role
महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत सहानुभूतीपूर्वक आहे’. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment