edible oil rate : गेल्या काही महिन्यांपासून किचनच्या बजेटमध्ये खाद्यान्न, डाळी, अन्नधान्य, मसाले आणि इतर अनेक पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे वाढ झाली होती. मात्र, आता गोडे तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी कमी झाल्या आहेत. सोयाबीन तेलाचे दर १०९ रुपये प्रति किलोपर्यंत म्हणजेच तीन वर्षांपूर्वीच्या पातळीवर आले आहेत.
पहा 15 व 7 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆
केंद्र सरकारच्या निर्णयाचे परिणाम
केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्यावर आणल्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, आणि पाम तेलाची आयात वाढली आहे. यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना, आणि रशिया-युक्रेनमध्ये पाम, सोयाबीन, व सूर्यफूलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत.
श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी सोनं स्वस्त झालं;
पहा आजचा सोन्याचा दर
आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने भारतात पामतेलाची उपलब्धता वाढली आहे. शाळा सुरू झाल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत लग्नसराई नसल्यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी होऊन विक्रीवर परिणाम झाला आहे. पुढील काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
पहा 15 व 7 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆
अशा परिस्थितीत, गृहिणींना थोडासा दिलासा मिळणार आहे कारण खाद्यतेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे त्यांच्या किचनच्या बजेटमध्ये काहीसा आराम मिळू शकतो.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.