edible oil price: किचनचे बजेट अनेक दिवसांपासून खाद्यान्न, डाळी, अन्नधान्य, मसाले आणि इतर अनेक पदार्थ महागल्याने वाढले होते. पण आता गोडे तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे (edible oil price) थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी कमी झाल्या असून सोयाबीन तेलाचे दर १०९ रुपये किलोपर्यंत म्हणजेच तीन वर्षांआधीच्या पातळीवर आले आहेत.
लाडकी बहीण योजना
या दिवशी जमा होणार पहिला हफ्ता
👆 येथे क्लिक करा व पहा 👆
केंद्र सरकारचा निर्णय
केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्यावर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाची आयात वाढली आहे. यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे. मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना आणि रशिया-युक्रेनमध्ये पाम, सोयाबीन व सूर्यफूलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत.
लाडकी बहीण योजना
या दिवशी जमा होणार पहिला हफ्ता
👆 येथे क्लिक करा व पहा 👆
आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती (edible oil price) कमी झाल्या आहेत. भारतात पामतेलाची उपलब्धता वाढली आहे. शाळा सुरू झाल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत लग्नसराई नसल्यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी होऊन विक्रीवर परिणाम झाला आहे. पुढील काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
खाद्यतेलाचे दर कमी (प्रति किलो) edible oil price today
तेल | 15 दिवसांपूर्वी | सध्याचे दर |
सोयाबीन | ११५ | १०९ |
पामतेल | ११२ | १०७ |
सूर्यफूल | १२४ | ११९ |
राइस ब्रान | १२० | ११५ |
जवस | १२४ | ११९ |
मोहरी | १४० | १३५ |
शेंगदाणा तेल | १७५ | १७५ |
योजना माहितीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.