edible oil price: बजेट सादर होण्यापूर्वीच खाद्यतेलाचे भाव घसरले; पहा 15 लिटर व 7 लिटर डब्याचे नवीन दर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

edible oil price: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम बजेट सादर करणार आहेत, त्यापूर्वी नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. खाद्यतेलाच्या वाढलेल्या भावामुळे घरगुती बजेट कोलमडत होते. मात्र आता नागरिकांना या संकटातून दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी कमी झाल्या असून, सोयाबीन तेलाचे दर १०९ रुपये प्रति किलोपर्यंत म्हणजेच तीन वर्षांआधीच्या पातळीवर आले आहेत.

खाद्यतेलाचे नवीन कमी झालेले भाव
पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण edible oil price change

शेंगदाणा तेल, मोहरी तेल, पाम तेल यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. भारतात पामतेलाची उपलब्धता वाढली आहे. शाळा सुरू झाल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत लग्नसराई नसल्यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी होऊन विक्रीवर परिणाम झाला आहे. पुढील काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

खाद्यतेलाचे नवीन कमी झालेले भाव
पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

तेल उत्पादक देशांमधील उत्पादन वाढ, आयात करांमधील बदल, आणि जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती यामुळे तेल उत्पादकांना आपल्या किंमती कमी कराव्या लागल्या आहेत. यामुळे ग्राहकांनाही याचा फायदा मिळत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की तेल उत्पादकांनी आणखी किंमती कमी करण्याची गरज आहे, कारण गेल्या काळात झालेल्या वाढीची भरपाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे येत्या काळात आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

खाद्यतेलाचे नवीन कमी झालेले भाव
पाहण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून शून्यावर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाची आयात वाढली आहे. यंदा देशांतर्गत सर्व तेलबियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे. मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना आणि रशिया-युक्रेनमध्ये पाम, सोयाबीन व सूर्यफूलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत.

खाद्यतेलाचे नवीन कमी झालेले भाव
पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नागरिकांची प्रतिक्रिया

या बातमीने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महागाईच्या सावलीतून थोडीफार सुटका मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

खाद्यतेलाचे नवीन दर (प्रति किलो)

तेल15 दिवसांपूर्वीसध्याचे दर
सोयाबीन115109
पामतेल112107
सूर्यफूल124119
राइस ब्रान120115
जवस124119
मोहरी140135
शेंगदाणा तेल175175
WHATSAPP GROUP LINK

Leave a Comment