e pik pahani:विमा आणि नुकसानभरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

e pik pahani अॅपवर पीक पेरणीची नोंदणी सुरू: भरपाईसाठी मिळणार मदत

गेल्या तीन वर्षांपासून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोबाइलवरील ई-पीक पाहणी अॅपवर पीक पेरणीची नोंदणी करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यंदाही, १ ऑगस्टपासून ही नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी या नोंदणीच्या आधारे पीकविमा दावे, पीक कर्जवाटप, आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळवण्यासाठी नोंदणी करावी.

ई-पीक पाहणी करा;तरच मिळेल पीक विमा

१ ऑगस्टपासून करा पीक पेरा नोंदणी

राज्य सरकारच्या भूमिअभिलेख व जमाबंदी आयुक्तालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये शेतकरी पातळीवर पीक नोंदणीसाठी ई-पीक पाहणी अॅप उपलब्ध करून दिले. या अॅपमुळे, तलाठ्याकडे न जाता, शेतकरी आपल्या घरातूनच सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करू शकतात. या नोंदणीसाठी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर असा कालावधी आहे.

5 रुपये दररोज गुंतवून 25 लाखांचा निधी प्राप्त करा; जाणून घ्या LIC ची हि योजना !

कोठे कराल नोंदणी?

भूमिअभिलेख विभागाने ई-पीक पाहणीचे नवीन सोपे व्हर्जन आणले आहे. या अॅपमुळे शेतकऱ्यांना ४८ तासांत नोंदणीत दुरुस्ती करता येते. जियो फेन्सिंगच्या सुविधेमुळे पिकांचे अचूक छायाचित्र घेतले आहे की नाही हे ठरविणे सोपे झाले आहे.

लाडकी बहीण योजनेचा मोठा निर्णय;मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा, दोन लाख महिलांना मिळणार फायदा!”

e pik pahani अॅपवर कशी कराल नोंदणी?

अॅप डाउनलोड केल्यानंतर, शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची आवश्यक माहिती भरल्यानंतर पिकांची नोंदणी करावी. या नोंदणीमुळे राज्यात कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात कोणते प्रमुख पीक आहे, याची माहिती मिळणे सुलभ झाले आहे.

सोन्याचे भाव परत पडले; खरंच भाव 50 च्या खाली जाणार का ? पहा आजचा भाव !

विमा आणि भरपाई हवी असेल तर करा नोंदणी

  • नोंद सातबारा उताऱ्यावर केली जाते आणि तीच अधिकृत नोंद आहे.
  • राज्य सरकारही याच माहितीचा उपयोग करून नैसर्गिक आपत्तीतील मदत, पीकविमा आदी कामांसाठी करणार आहे.
  • साखर आयुक्तालय देखील याच माहितीचा उपयोग करू शकेल. सहकार विभाग, पणन विभाग तसेच बँकांनाही कर्ज वितरणात याच माहितीचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Comment