Digital Crop Survey: राज्यातील ३४ तालुक्यांत होणार डिजीटल क्रॉप सर्वेक्षण; इतर तालुक्यांत होणार ई पीक पाहणी ! पहा तालुक्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Digital Crop Survey;राज्यातील ई पीक पाहणी अधिक अचूक व्हावी यासाठी केंद्र सरकारने डिजीटल क्रॉप सर्वेक्षण प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे सरकारला अधिक अचूक माहिती मिळणार आहे. राज्यातील पेरण्यांची नोंद सातबाऱ्यावर ऑनलाईन करण्यासाठी ई पीक पाहणी आवश्यक आहे. पण अनेकदा शेतकरी शेतात न जाता किंवा चुकीची नोंदणी करून ई पीक पाहणी करतात. यामुळे अधिक अचूकतेसाठी केंद्र सरकारने डिजीटल क्रॉप सर्वेक्षण सुरू केले आहे.

सोन्याचे भाव परत पडले;
खरंच भाव 50 च्या खाली जाणार का ?
येथे क्लिक करा व पहा आजचा भाव !

Digital Crop Survey:डिजीटल क्रॉप सर्वे आणि ई पीक पाहणी जवळपास सारखेच आहेत. परंतु डिजीटल क्रॉप सर्वे करताना शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या गट हद्दीत जाणे अनिवार्य आहे. त्यामुळे अधिक अचूक माहिती सरकारपर्यंत पोहोचणार आहे.

सध्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांत डिजीटल क्रॉप सर्वे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामध्ये २,८५८ गावांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना लाईव्ह लोकेशन ट्रॅक करून गट हद्दीत जाऊन पिकाचा फोटो अपलोड करावा लागेल.

विमा आणि नुकसानभरपाई हवी
तर अशी करा पीक पेरा नोंदणी
येथे क्लिक करा

तुमच्या तालुक्याचे नाव खालील यादीत आहे का, पाहा

  • अमरावती: वरुड
  • बुलडाणा: बुलडाणा
  • यवतमाळ: दिग्रस
  • वाशिम: रिसोड
  • छ. संभाजी नगर: फुलंब्री
  • धाराशीव: लोहारा
  • जालना: बदनापूर
  • नांदेड: मुदखेड
  • परभणी: सोनपेठ
  • बीड: वडवणी
  • लातूर: जळकोट
  • हिंगोली: औंढा नागनाथ
  • ठाणे: अंबरनाथ
  • पालघर: तलासरी
  • सिंधुदुर्ग: वेंगुर्ला
  • रायगड: तळा
  • रत्नागिरी: लांजा
  • नागपूर: काटोल
  • गडचिरोली: देसाईगंज /वाडसा
  • भंडारा: साकोली
  • चंद्रपूर: सिंदेवाही
  • गोंदिया: आमगाव
  • नाशिक: देवळा
  • अहमदनगर: श्रीरामपूर
  • जळगाव: भुसावळ
  • धुळे: शिंदखेडा
  • नंदुरबार: तळोदा
  • अकोला: पातूर
  • पुणे: दौंड
  • कोल्हापूर: गगनबावडा
  • सांगली: पळूस
  • सातारा: खंडाळा
  • सोलापूर: द. सोलापूर
  • वर्धा: कारंजा (घा)

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp