डिझेल आणि पेट्रोलच्या मर्यादित साठ्यामुळे पर्यावरणपूरक नैसर्गिक वायू, म्हणजेच सीएनजीचा इंधन म्हणून वापर वाढत आहे. ही हरित चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणी सीएनजी स्टेशन्स उभारली जाणार आहेत.
अवघ्या 1.5 लाखात कार आणि 18 हजारात बाईक! जाणून घ्या बँकेच्या लिलावातून गाड्या कशा मिळवाव्यात!
इंधन म्हणून डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किमती आणि त्यांचा मर्यादित साठा लक्षात घेता, नैसर्गिक वायूच्या वापराकडे कल वाढू लागला आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी, म्हणजेच 2019-20 दरम्यान, जिल्ह्यात सीएनजी गॅसचा पुरवठा सुरू झाला. सुरुवातीला रत्नागिरीच्या मुख्य ठिकाणांसह मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणीच सीएनजी गॅसचा पुरवठा होत होता.
Honda ने लॉन्च केली नवीन Unicorn 160 बाइक – बाहुबली इंजिनसह, कडक किंमत
आपल्या जिल्हयातील CNG PUMP FORM भरण्या साठी येथे क्लिक करा
Application for CNG Retail Outlets
सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) हा वायू पर्यावरणपूरक असल्यामुळे प्रदूषण रोखण्यात मदत होऊ लागली आहे. तुलनेने तो स्वस्तही आहे. वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यासोबतच, रत्नागिरी शहरात घरगुती वापरासाठी पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) देखील पुरवला जात आहे. स्वयंपाकासाठी घरगुती गॅस म्हणून त्याचा पुरवठा पाच वर्षांपासून सुरू आहे. आता या पर्यावरणपूरक गॅसचे सेवाक्षेत्र अधिक व्यापक केले जाणार आहे.
Tata Punch ला टक्कर द्यायला तयार आहे Maruti ची नवी दमदार Maruti Swift कार
याआधी जिल्ह्यात अशोका गॅस कंपनीकडून ही सेवा पुरवली जात होती. आता मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये ही सेवा पुरवणाऱ्या महानगर गॅस कंपनीने आधीच्या सेवा पुरवठादार कंपनीचा ताबा घेतला आहे. नव्या महानगर गॅस कंपनीने जिल्ह्यात पाच ठिकाणी नव्याने सीएनजी स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने जिल्ह्यातील नागरिकांना स्वतःचे सीएनजी स्टेशन उभारण्याची संधी देत, 4 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविले आहेत.
अधिक माहितीसाठी वेबसाईट ला भेट द्या
गॅस पुरवठादार कंपनीच्या जाहिरातीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड, चिपळूण, आरवली, लांजा (हातखंबा ते लांजा), साखरपा अशा पाच ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारणार आहेत.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.