Cm ladki bahin yojana:”मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेत मोठा बदल: आता महिलांना मिळणार ‘इतके’ मोफत गॅस सिलिंडर!”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cm ladki bahin yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण घोषणा; राज्य सरकारचा दिलासा

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना अधिक व्यापक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ मंत्र्यांशी सल्लामसलत करून या योजनेची व्याप्ती वाढवण्याचे ठरवले आहे. राज्यातील 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहे.

मोठी बातमी! केंद्र सरकार देत आहे
3 लाख रुपयांचे कर्ज तेही कमी व्याजदरावर,
👆 अर्ज कसा करावा, पहा 👆

महायुती सरकारची नवीन घोषणा

महायुती सरकारने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (CM Ladki Bahin Yojana) जाहीर केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आता राज्य सरकारने आणखी एक लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhyamantri Annapurna Yojana) व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना त्यात समाविष्ट करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.

शासकीय आदेश आणि तयारी

या निर्णयासंदर्भात लवकरच शासकीय आदेश काढला जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारी सुरु केली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

BSNLचा जबरदस्त धमाका ! 105 दिवसांचा सर्वात स्वस्त
रिचार्ज प्लॅन मिळवा तुफान फायदे!
👆 येथे क्लिक करा व पहा 👆

अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती. महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली जात आहे. या योजनेतंर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिले जातील. राज्यातील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल, असे अजित पवार यांनी सांगितले होते.

तीन सिलिंडर मोफत मिळवण्यासाठी प्रक्रिया

अजित पवारांच्या अर्थसंकल्पात अन्नपूर्णा योजनेच्या घोषणेनंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडला होता. उज्ज्वला योजनेतील महिलांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडरमागे 300 रुपये अनुदान देते. एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत 830 रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे तीन सिलिंडर मोफत देण्याचा प्रस्ताव मांडला गेला. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा होऊ शकतो, मात्र सरकारी तिजोरीवर आणखी भार पडू शकतो. नियोजन आणि वित्त विभागाने लाडक्या बहिणींना अतिरिक्त लाभ देण्यास विरोध केला होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेसाठी आग्रही असल्याचे समजते.

योजना राबवण्यासाठी पुढील प्रक्रिया

लाडक्या बहिणींना तीन सिलिंडर मोफत देण्यासाठी गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पैसे दिले जाणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे, ज्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना आळा बसेल. गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच योजनेचा लाभ मिळेल. या अटींमुळे लाडकी बहिण योजनेचा लाभ साधारणत: अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस आहे. मोफत गॅस सिलिंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांना मिळेल, असा अंदाज आहे. या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा भार पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment