cheapest ev car in india: लिथियम-आयन बॅटरीचा साठा कमी होत असताना, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र आता नवीन पर्याय शोधत आहे. सोडियम आयन बॅटरी वापरल्याने आता इलेक्ट्रिक कारची किंमत कमी होऊ शकते. या बॅटरीज् बाजारात सहज उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
cheapest ev car in india
इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक बदल होत आहेत. हे क्षेत्र दिवसेंदिवस विविध अपडेट्ससह प्रगती करत आहे. सध्या, जगभरातील इलेक्ट्रिक कार लिथियम-आयन बॅटरीवर तयार केल्या जात आहेत. परंतु लिथियमचा पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे लिथियमच्या पर्यायाचा शोध सुरूच होता त्यात चिनी कंपनीने सोडियम आयन बॅटरीवर आधारित पहिली ev car आणण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या किंमती कमी होऊन या गाड्या आणखी स्वस्त होऊ शकतात, असा अंदाज आहे.
ev car battery price
या महिन्याच्या शेवटी कार बाजारात उपलब्ध होणार
सोडियम आयन बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक कार बाजारात उपलब्ध होईल. चिनी ऑटोमोबाईल कंपनी जेएसी मोटर्सने लिथियमशिवाय इलेक्ट्रिक कार बनवण्याचे आव्हान पेलले आहे. कंपनी सोडियम आयन बॅटरीवर आधारित कार लॉन्च करत आहे. जानेवारी 2024 पर्यंत नियोजनानुसार ही कार या महिन्याच्या अखेरीस बाजारात उपलब्ध होईल.
ev car जेएसी यीवेई EV हॅचबॅक
जेएसी मोटर्सचा दावा आहे की सोडियम आयन बॅटरीची किंमत लिथियम बॅटरीपेक्षा कमी आहे. ही बॅटरी सर्व हवामानात चांगली कामगिरी करते, ज्यामुळे ती इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. चीनी मीडियानुसार, JAC वाहनांची यीवेई EV हॅचबॅक या महिन्याच्या अखेरीस ग्राहकांना उपलब्ध होईल.
पहिली सोडियम आयन बॅटरी असलेल्या कारबद्दल विशेष काय?
JAC वाहनांच्या यीवेई EV हॅचबॅक कारला चार दरवाजे आहेत. यात HiNa सोडियम बॅटरी आहे. त्याची क्षमता 25 किलोवॅट असेल आणि ती 20 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. या कारची रेंज 252 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. व्यावसायिक दाव्यांनुसार, सोडियम आयन बॅटरी लिथियम आयन बॅटरीपेक्षा अधिक किफायतशीर असतील. त्यामुळे ते इलेक्ट्रिक कार विभागात क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकू शकते. मॉड्युलर युनिटाइज्ड एन्कॅप्सुलेशन पद्धती वापरून बॅटरी एकत्र करण्यात आली आहे.
कमी आणि उच्च दाबावर शक्तिशाली कामगिरी
सोडियम आयन बॅटरीची घनता खूप कमी असते. तर लिथियम आयन बॅटरीची घनता जास्त असते. त्यामुळे सोडियम बॅटरी कमी आणि उच्च दाबाखाली चांगली कामगिरी करतात. सोडियम आयन बॅटरीची चार्जिंग स्पीड लिथियम आयन बॅटरीच्या अंदाजे दुप्पट आहे. त्यामुळे भविष्यात या बॅटरींमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत वाढ होण्याची शक्यता आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.