budget 2024: सरकारच्या या मोठ्या घोषणेमुळे; सोनं झालं स्वस्त !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

budget 2024 नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प (budget 2024)संसदेत सादर केला आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काही सवलती मिळाल्या आहेत. विशेषत: सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी (Custom duty on gold) कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी आता 6 टक्के करण्यात आली आहे, ज्यामुळे सराफा बाजारात मोठा बदल दिसून येणार आहे.

Union Budget 2024 चा अर्थसंकल्प सादर
पहा काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार ?
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆

या निर्णयामुळे बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दागिन्यांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत, या बदलाचा फायदा सर्वांना होणार आहे. सोने-चांदीच्या किमतीत झालेल्या घटामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या हालचालींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सोने आणि चांदीची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

Union Budget 2024 चा अर्थसंकल्प सादर
पहा काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार ?
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆

अर्थमंत्री सीतारामन यांच्या या निर्णयाने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल आणि बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे.

मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला. या बजेटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सोने-चांदीच्या वाढत्या किंमतींबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता होती. सीमा शुल्कात कपातीची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार, केंद्र सरकारने सीमा शुल्कात (Custom Duty) कपात केली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज सकाळच्या किंमतीत आणि थोड्या वेळापूर्वीच्या किंमतीत त्यामुळे बदल दिसला. आता सराफा बाजारात या एका निर्णयाने मोठा फरक दिसून येणार आहे. ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे.

नोकरीची संधी ! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि
1021 पदांसाठी भरती, पगार 30 ते 88 हजार
👆 येथे क्लिक करा व माहिती पहा 👆

सीमा शुल्कात केली कपात

केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून कमी करून 6 टक्के करण्यात आली आहे. कस्टम ड्युटीत अर्ध्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सराफा बाजारात आता पुन्हा चैतन्य दिसून येईल.

केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात वाढ केली होती. कस्टम ड्युटी 15 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. आज केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी सीमा शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून 6 टक्के करण्यात आली आहे.

join whatsapp

आज मंगळवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसली आहे. सोने जवळपास 2 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. बजेट संपताच सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 1988 रुपयांपर्यंत खाली आली. या घसरणीनंतर सोने 70730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.

चांदीच्या किंमतीत बजेट संपल्यानंतर मोठी घसरण दिसली. चांदीच्या किंमतीत प्रति किलो 2429 रुपयांची घसरण दिसली. बजेट संपल्यानंतर चांदीची किंमत 86774 रुपये प्रति किलोवर आल्या आहेत. सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होण्याची सराफा दुकानदारांची अपेक्षा आहे. जर सोने आणि चांदीची मागणी वाढली तरी किंमतीत बदल दिसू शकतो.

WHATSAPP GROUP LINK

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp