महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा – शासनाने घेतला मोठा निर्णय
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. 2024 साठी पिक विमा वितरणास सुरुवात होणार आहे. शासनाने पिक विमा वितरणाचा मोठा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पिक विमा मंजूर झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता पिक विमा रक्कम मिळणार आहे.
33% नुकसान भरपाई आधीच देण्यात आलेली
मागील काही काळात 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा रक्कम आधीच देण्यात आली होती. आता उर्वरित 75% पिक विमा रक्कम वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे. याबाबत शासनाने सूचना दिलेल्या आहेत आणि पिक विमा कंपन्यांकडे रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.
विविध जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरुवातीस
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेले पिक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थिती आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पाहता, उर्वरित पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे.
राज्यभरातील 18 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरुवात
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरुवात होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मिळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही पिक विमा रक्कम दिली जाणार आहे. रब्बी पिक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे रक्कम संबंधित इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्त केलेली आहे.
खरीप आणि रब्बी हंगामासाठी विमा वितरण
महाराष्ट्रातील खरीप आणि रब्बी हंगामासाठी पिक विमा रक्कम वितरणाची सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये लवकरच सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी अधिकारी आणि संबंधित विभागांमध्ये माहिती घ्यावी.
सरकारकडून अधिकृत घोषणा
सरकारने अधिकृत जीआर काढलेले आहेत आणि काही जिल्ह्यांमधील पिक विमा वितरणास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला विमा मिळवण्यासाठी तयारी करावी.
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या पिक विमा वितरणामुळे थोडीशी उभारी मिळेल.
अधिक माहितीसाठी तत्काळ संपर्क साधा आणि आपल्या हक्काचे पिक विमा रक्कम मिळवा.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.