ladki bahin yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: आतापर्यंत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केले!
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ अंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केले आहेत आणि आता या अर्जदार महिलांना पात्रता यादीची प्रतीक्षा आहे. चला जाणून घेऊया पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे.
कमी EMI मध्ये स्वतःचे घर! एचडीएफसी बँकेची ही ऑफर तुमच्यासाठीच आहे !
लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून दररोज हजारोंच्या संख्येने महिला अर्ज करत आहेत. दररोज साधारण 70 ते 80 हजार महिलांचे अर्ज येत आहेत. आतापर्यंत अर्जदार महिलांची संख्या 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 च्या घरात पोहोचली आहे. आता या महिलांसमोर त्यांच्या अर्जाची पात्रता निश्चित करण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे या महिलांना पात्रता यादीची प्रतीक्षा आहे.
कुठे पाहाल यादी?
लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे. प्रत्येक गावातील समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहे. त्यामुळे महिलांनी गावातील समितीची यादी वाचनाच्या दरम्यान हजर राहावे लागणार आहे, ज्यामुळे त्यांच्या अर्जाची पात्रता निश्चित होईल.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठी घसरण;
1ऑगस्ट पासून नवीन दर लागू !
येथे क्लिक करा व पहा
योजनेत 6 मोठे बदल:
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊया हे 6 मोठे बदल कोणते आहेत:
- योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.
- परराज्यात जन्मलेल्या महिलांना, ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरूषासोबत विवाह केला आहे, त्यांना त्यांच्या पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या यादीचे वाचन केले जाणार आहे आणि आवश्यक असल्यास बदल करावे लागणार आहेत.
- केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे, मात्र त्यांना ऑफलाईन अर्ज भरावा लागणार आहे.
- नवविवाहित महिलांच्या विवाह नोंदणी नसल्यास त्यांच्या पतीच्या रेशनिंग कार्डला पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
- महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत.
लाडकी बहीण योजना;
पात्र व अपात्र महिलांची यादी जाहीर! यादीत नाव पहा
येथे क्लिक करा व पहा
लाभार्थी यादी आणि हप्ता वितरण:
- पात्र महिलांची यादी दर शनिवारी ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीत उपलब्ध होणार.
- पहिला हप्ता (3000 रुपये) 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान वितरित होणार.
- 31 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज केलेल्या महिलांना 1 जुलै 2024 पासून लाभ मिळणार.
महत्त्वाचे कागदपत्रे:
महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:
- आधार कार्ड
- आदिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र (पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी)
- बँक पासबुक
- फोटो
राज्य सरकारने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.