Breaking news: शिंदे सरकारची आणखी एक योजना; सर्व मुलींना मिळणार मोफत ?Free Education Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Education Yojana: शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी मोफत शिक्षण योजना आता राज्यातील मुलींसाठी लागू करण्यात आली आहे. वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, पूर्ण फी माफ होणार नाही, तर फक्त काही विशिष्ट फीचाच लाभ मिळणार आहे.

आज पुन्हा सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याचे भाव कोसळले; खरंच सोन्याला जुने भाव येणार का ? पहा आजचा भाव  

कोणत्या मुलींना मिळणार लाभ? या योजनेत केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना फायदा होणार आहे. पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान अशा शाखांतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अटी आणि नियम:

  • केवळ वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींना लाभ.
  • फक्त व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी.
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनींना लाभ.

नवी CNG कार घ्यायची आहे? तर हे ३ बेस्ट ऑप्शन, मिळतोय 34km पेक्षा जास्त मायलेज; जाणून घ्या डिटेल्स!

Free Education Yojana माफ होणाऱ्या फीचे तपशील:

  • फक्त परीक्षा फी आणि ट्युशन फी माफ होणार.
  • विकास निधी, हॉस्टेल फी, प्रयोगशाळा फी, लायब्ररी, मेस, हॉस्टेल यांना लागणारी फी, आणि डिपॉझिट भरावी लागणार.
  • जवळपास २५ ते ३५ टक्के फी विद्यार्थिनींना भरावी लागणार.

Free Education Yojana प्रक्रिया कशी असेल?

  • कोणतीही वेगळी प्रक्रिया नाही.
  • शासनाच्या GR मध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे की, ‘ज्या विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञय आहे, त्यांच्याकडून प्रवेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा.’
  • ‘शिक्षण संस्थांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील या योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थिनींना प्रवेशाच्या वेळी संपूर्ण फी भरावी, असा आग्रह धरला किंवा मागणी केली तर अशा संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.’

LIC ची जबरदस्त पॅालिसी,एकदाच गुंतवून आयुष्यभर ₹१ लाखांची पेन्शन मिळवा!

Free Education Yojana कोणत्या विद्यापीठांमध्ये योजना लागू?

  • शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, गोखले इन्स्टिट्यूट, टीस, सीओईपी अशा शासकीय अभिमत विद्यापीठांमध्ये योजना लागू.
  • भारती विद्यापीठ, डी. वाय. पाटील, सिम्बायोसिस, संदीप, जेएसपीएम, एमआयटी या स्वयम अर्थ सहाय्यित विद्यापीठांमध्ये योजना लागू नाही.

Free Education Yojana ईडब्ल्यूएस आरक्षणातील विद्यार्थिनींना लाभ:

  • ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राऐवजी आई-वडील दोघांच्याही एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र लागू.
  • प्रथम वर्षासाठी लाभानंतर अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सवलत लागू राहील.

केवायसी अनिवार्य; महिलांच्या खात्यात १७ ऑगस्ट रोजी जमा होणार ३,००० रुपये !

Free Education Yojana योजनेतील त्रुटी:

  • ही योजना फक्त महाराष्ट्रातील मुलींसाठीच आहे.
  • IIT खरगपूर, IIM अहमदाबाद, एम्स दिल्ली अशा बाहेरील संस्थांमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थिनींना लाभ मिळणार नाही.

Leave a Comment