Breaking news: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर;सरकार देणार 5 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान GR जारी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महत्वाची माहिती

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली आहे.

अनुदानाची रक्कम कशी मिळणार ?

सन 2023 च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

किती अनुदान मिळणार ?

शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये तर 2 हेक्टरीच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपये या प्रमाणे अनुदान दिले जाईल. कापूस उत्पादकांसाठी 1548 कोटी 34 लाख रुपये आणि सोयाबीन उत्पादकांसाठी 2646 कोटी 34 लाख रुपये असा एकूण 4192 कोटी 68 लाख रुपये निधी खर्चासाठी मान्यता देण्यात आली आहे.

कोण पात्र ?

ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून, डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे.

त्वरित अंमलबजावणी

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन केलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. महायुती सरकारने आपला शब्द पाळला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर असून, या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment