Bank Holiday on Raksha Bandhan 2024:रक्षाबंधनला तुमची बँक बंद असेल का; जाणून घ्या 19 ऑगस्टचा महत्वाचा अपडेट!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशभरात 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बँकांना सुट्टी असेल का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

Bank Holiday on Raksha Bandhan 2024: सोमवार, 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे. या दिवशी भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा उत्सव होतो. बहिण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुरक्षिततेची प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. त्यामुळे अनेक जण या दिवशी बँका बंद असतील का, याची चौकशी करत आहेत.

या दिवशी 18व्या हप्त्याचे 6000 रुपये मिळणार? पीएम किसान योजनेची महत्त्वाची तारीख !

जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही महत्वाचे काम असेल, तर सोमवार 19 ऑगस्ट रोजी बँका चालू राहतील का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काही राज्यांमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी बँकांना सुट्टी असेल, तर इतर काही राज्यांमध्ये बँका नेहमीप्रमाणेच सुरू राहतील.

19 ऑगस्ट रोजी कोणत्या राज्यांत बँका बंद राहतील?

रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी, अगरतळा, अहमदाबाद, भूवनेश्वर, देहरादून, जयपूर, कानपूर, लखनौ, आणि शिमला या शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. या राज्यांत बँकांची सेवा बंद राहील. मात्र, इतर ठिकाणी बँका नेहमीप्रमाणे चालू असतील.

ड्रायव्हिंग लायसन्स नियमात बदल RTO चे नवीन नियम लागू ; जाणून घ्या नवीन नियम नाहीतर !

महाराष्ट्रात रक्षाबंधनच्या दिवशी बँका सुरू असतील का?

होय, महाराष्ट्रात 19 ऑगस्ट रोजी बँकांना सुट्टी नसेल. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम असेल, तर ते तुम्ही या दिवशी सहज करू शकता.

ऑगस्ट महिन्यात बँक सुट्ट्या

ऑगस्ट महिन्यात आणखी काही दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. 20 ऑगस्ट रोजी श्री नारायण गुरु जयंती निमित्त कोची आणि तिरुअनंतपूरम येथे बँका बंद राहतील. 24 ऑगस्ट हा चौथा शनिवार असल्याने संपूर्ण देशभरात बँका बंद असतील. 25 ऑगस्ट रोजी रविवार असून बँकांना सुट्टी राहील. तसेच, 26 ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने देशातील काही ठिकाणी बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे या सुट्ट्या लक्षात घेऊन तुम्ही बँकेचे कामकाज नियोजित करावे.

दरम्यान, बँकांना सुट्टी असली तरीही ऑनलाईन बँकिंग सेवा 24×7 सुरू राहील. त्यामुळे तुम्ही या काळात ऑनलाईन व्यवहार करू शकता.

Leave a Comment